नव्या मंत्र्यांना राज्यपालांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ , सहा मंत्र्यांना डच्चू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  राज्य  सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज  रविवारी सकाळी पार पडला. यामध्ये १३ नव्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. सकाळी ११ वाजाता राज्यपालांनी नवीन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुंबईमधील मलबार हिल येथील राजभवन येथे नव्य मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.  नवीन सदस्यांना मंत्रीमंडळात स्थान देताना सहा सदस्यांना डच्चू देण्यात आला आहे. 
राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, राजे अम्ब्रीशराव महाराज अत्राम यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. कारण ते शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांसोबत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या फडणवीस सरकारच्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नवीन मंत्री 

कॅबिनेट –
प्रकाश मेहता ( गृहनिर्माणमंत्री)
विष्णू सवरा : (आदिवासी विकास मंत्री )
राजकुमार बडोले (सामाजिक न्याय मंत्री )

राज्यमंत्री – 
प्रवीण पोटे पाटील (पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम )
अंबरिश अत्राम (आदिवासी विकास)
दिलीप कांबळे (सामाजिक न्याय)


यांनी घेतली शपथ 

– राधाकृष्ण विखे पाटील
– जयदत्त शिरसागर
– डॉ. आशिष शेलार
– डॉ. संजय कुटे
– सुरेश दगडू खाडे
– डॉ. अनिल बोंडे
– डॉ. अशोक उईके
– तानाजी जयवंत सावंत

राज्यमंत्री
– योगेश सागर
– अविनाश माहतेकर
– संजय भेगडे
– परिणय फुके
– अतुल सावे  Print


News - Rajy | Posted : 2019-06-16


Related Photos