केरळ मध्ये महिला पोलिसांना भरदिवसा जिवंत जाळले


वृत्तसंस्था / मावेलिक्कारा (केरळ) : येथील अलाप्पुझा जिल्ह्यात एका महिला पोलिसाला शनिवारी भरदिवसा जिवंत जाळण्यात आले. सौम्या पुष्पाकरण (३४) असे त्यांचे नाव आहे. आरोपीने पहिल्यांदा त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले व नंतर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यात सौम्या यांचा जागीत मृत्यू झाला. दरम्यान, अजाझ नावाचा हा आरोपी वाहतूक पोलिस असल्याची माहिती समोर आली आहे. 
सौम्या दुपारी तीनच्या सुमारास ड्युटी संपवून मोटारसायकलवरून घरी येत असताना कारमधून आलेल्या अजाझने त्यांच्या दुचाकीला टक्कर देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर सौम्या यांनी उठून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पाठलाग करून प्रथम त्यांच्यावर शस्त्राने वार केले व नंतर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात सौम्याचा जागीच मृत्यू झाला, तर अजाझही या घटनेत जमखी झाला आहे. सौम्या यांचा पती परदेशात नोकरीस असून, त्या आपल्या तीन मुलांसह वल्लिकुन्नम येथे राहत होत्या. या हल्ल्यामागील कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.  Print


News - World | Posted : 2019-06-16


Related Photos