विश्वचषक : जगाचे लक्ष लागलेली भारत - पाकिस्तान लढत आज , पावसाची शक्यता


वृत्तसंस्था /  मँचेस्टर  :   वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत संपूर्ण जगाचे लक्ष  लागलेल्या  लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आणि त्यांचे चाहते पूर्णपणे सज्ज आहेत.   या लढतीवर पावसाचे सावट असल्यामुळे ती लढत वाया जाऊ नये अशी प्रार्थना दोन्ही देशांचे खेळाडू तसेच चाहतेही करत आहेत.  
भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय येऊ शकतो. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २.३० वाजता नाणेफेक होणार असून त्यादरम्यान पावसाची शक्यता ४३ टक्के इतकी आहे. पाऊस असल्यास नाणेफेकीला उशीर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीन वाजता (स्थानिक वेळ १०.३० वाजता) हा सामना सुरू होणे अपेक्षित आहे. तीन वाजता ४३ ते ४७ टक्के पावसाची शक्यता असून वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी, असे साकडे सगळेच घालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रविवारी मँचेस्टरचं हवामान कसं राहणार, याबाबत भारतीय चाहते गुगलवरही मोठ्या प्रमाणात सर्च करताना दिसत आहेत. 

   Print


News - World | Posted : 2019-06-16


Related Photos