दारूतस्करांनी अंगावर वाहन चढविल्याने उत्पादन शुल्क विभागाचे दोन निरीक्षक गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
  प्रतिनिधी / गडचिरोली : 
दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचल्यानंतर आलेल्या वाहनास अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता दारूतस्करांनी निरीक्षकांच्याअंगावर वाहन चढवून दोन निरीक्षकांना गंभीर जखमी केल्याची घटना  आज १५ जुन रोजी चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर घडली.  
 सोमेश्वर गव्हारे, विलास महाकुलवार  अशी गंभीर जखमी अधिकाऱ्यांची नावे असुन दोघेही गडचिरोली येथील  उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात निरिक्षक पदावर कार्यरत आहेत.  प्राप्त माहितीनुसार गोंदीयाकडून चामोर्शीकडे वाहनातुन दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती गडचिरोली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार  चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर गडचिरोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी  सोमेश्वर गव्हारे आणि विलास महाकुलवार हे नाकाबंदी करीत असतांना आरोपी  पिंटु मंडल गडचिरोली व निलेश टिकले  रा.कुनघाडा यांनी जिव घेण्याचा उद्देशाने लावलेल्या बैरीकेटवर सरळ आपले  चार चाकी वाहन चालविले. वाहनाने बैरिकेट तुटून ते सोमेश्वर गव्हारे व विलास महाकुलवार यांच्या डोक्याला व छातीला लागुन गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत प्रथम गडचिरोली येथे हलविण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी  चंद्रपुर येथे हलविण्यात आले.
घटनेसंदर्भात चामोर्शी पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध ३०७, ३५३, ३३२, ४२७, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-15


Related Photos