शासकीय निवासस्थानाची तोडफोड व मारहाण केल्याप्रकरणी माजी नगरसेवक कात्रटवार, चौधरी यांना ५ वर्षांचा सश्रम कारावास


- गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गडचिरोली
: शासकीय निवासस्थानाची तोडफोड व मारहाण केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम.पाटील यांच्या न्यायालयाने माजी नगरसेवक राजेश कात्रटवार (५०) , रमेश  चौधरी (४५)  रा.गडचिरोली  यांना   पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 
१९ आगष्ट २०१० रोजी फिर्यादी  मुख्याधिकारी दिपक इंगोले हे आपल्या शासकीय निवासस्थानामध्ये हजर असताना आरोपींनी  त्यांंच्या निवासस्थानी जावून शासकीय निवासस्थानाचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला तसेच खिडकी व दरवाजे लोखंडी ग्रिल तोडले. याबाबत फिर्यादीने ‘तुम्ही माझा घरी कशाला आले’ अशी विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या वडीलास व साळ्यास मारहाण करून दुखापत केली अशी तक्रार गडचिरोली नगरपरीषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी इंगोले यांनी  गडचिरोली पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी चौकशी करून न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. या प्रकरणावर आज १५ जून रोजी अंतिम सुनावनी झाली. मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम.पाटील यांनी साक्षी पुराव्याच्या आधारे  चौधरी व कात्रटवार यांना  विविध कलमान्वये शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-15


Related Photos