बोरचांदली रेतीघाटावरून तस्करी : रेतीतस्करांच्या आवळल्या मुसक्या, १० लाखाची दंडात्मक कार्यवाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल
: तालूक्यातील बोरचांदली रेतीघाटावरून रेतीची अवैद्य तस्करी करणाऱ्या  पाच वाहनांवर आज १५ जून रोजी कार्यवाही करण्यात आली. सदर ची कारवाई पाहाटे तीन ते चार च्या दरम्यान मुल -  चंद्रपूर मार्गवरील जानाळा या गावाजवळ करण्यात  आली.
 रेतीघाटांचा अद्यापही लिलाव झाला नसतानाही तालूक्यातील बोरचांदली रेतीघाटावष्न अवैद्य रेती तस्करी करीत असल्याची माहिती मिळताच येथील उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर आणि तहसिलदार डि जी जाधव यांनी पहाटे धाड टाकून पाचही वाहनाना आपल्या ताब्यात घेतले. 
  सदर ची कार्यवाही रात्रौ अवैध वाहतूक करणे या कारणावरून केली असली तरी सदरहू वाहनांच्या चालकाकडे या बाबतची कोणतेही परवाने नव्हते. तालूका प्रशासनाच्या या दंडात्मक कार्यवाही मुळे रेतीतस्कारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहे. त्यामूळे रेती तस्कारांमध्ये खळबड माजली आहे. याबाबत माहिती देतांना तहसिलदार डि.जी. जाधव यांनी सांगितले की, पाचही वाहनांनवर दंडात्मक कार्यवाही करण्यात  येईल. याबाबत  त्यांना नोटीस बजावले आहेत. पाचही वाहनांन वर जवळपास  १० लाखांचा दंड आकारल्या जाईल. 
 तालूक्यात रेतीची अवैद्या तस्करी मोठया प्रमाणात सुरू असून आजच्य कार्यवाहीमुळे रेती तस्काराचे धाबे दणाणले आहेत एम एच ४० ए.के. ८८८१ एम.एच ३४ बि जी ५१६३ , एम एच ३४ बि जी ४१८३ , एम एच ३४ बिजी ४४१२ , असे चार हायवा आणि एक ट्रॅक्टर प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले आहेत.  सदरची वाहने चंद्रपूर येथील रेती ठेकेदार दरबार आणि वाघ यांच्या मालकीची असल्याचे बोलल्या जाते .

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-15


Related Photos