कांकेर येथे नक्षलवाद्यांकडे आढळल्या पाकिस्तानी बनावटीच्या रायफल


वृत्तसंस्था / कांकेर :  छत्तीसगडमधील कांकेर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. यावेळी नक्षलवाद्यांकडून काही शस्त्र आणि साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये  पाकिस्तानी  बनावटीच्या रायफल  आढळल्या आहेत. यामुळे नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवण्यात येत असावी असा संशय सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे. 
गुरुवारी रात्री कांकेरमधील तडोकी येथे गस्त घालणाऱ्या जवानांसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून पाकिस्तान बनावटीच्या रायफल आढळल्या. या रायफल खास लष्करासाठीच असतात. त्यामुळे नक्षलवाद्यांना थेट पाकिस्तानकडून अथवा दहशतवाद्यांकडून मदत मिळते का, याचा तपास करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नक्षली आणि पाक दहशतवादी यांच्यात संबंध असल्यास ही गंभीर बाब असेल असेही या अधिकाऱ्याने नमूद केले, असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दरम्यान, या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, एक १२ बोर रायफल, काडतूसे आणि इतर साहित्य आढळले.   Print


News - World | Posted : 2019-06-15


Related Photos