उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या १६ जून रोजी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. त्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. 
राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन येथील गार्डनवर पार पडणार आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2019-06-15


Related Photos