महत्वाच्या बातम्या

 रत्नापुर येथे एक तारीख एक तास श्रमदान स्वच्छता मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवस २०२३ च्या निमित्याने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

रत्नापुर ग्रामपंचायत यांच्या वतीने अंगणवाडी क्रमांक सात इंदिरानगर (हेटी) या ठिकाणी एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

यावेळी या अभियानात रत्नापुर सरपंच अशोक गभणे, ग्रामसेवक नरेंद्र वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव दडमल, रजनी काउलकर, नजरी मेश्राम, बार्टीच्या समता दूत कृपाली धारणे, अंगणवाडी केंद्रातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी रत्नापुर येथील आंगनवाड़ी, रत्नापुर फाटा परिसर तसेच अंगणवाडी समोरील, ग्रामपंचायत परिसर महा श्रमदान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी सतोष धुर्वे, रामकृष्ण गळमळे, प्रमोद भरडे, राहुल कोवे व सुनील पालकर या मोहिमेत सहभाग  घेतला.





  Print






News - Chandrapur




Related Photos