दारूविक्रेत्याकडून १ लाख २० हजारांचा दारूसाठा जप्त, आरोपी जंगलात फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर
: चिमूर शहरापासून ७  किलोमीटर अंतरावर  आज १४  जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे कार्यवाही करत १ लाख २० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात यश आले.  मात्र आरोपी पसार झाले आहेत. 
 सदर कार्यवाही चिमूर शहरापासून ७ किमी अंतरावर मालेवाडा टी-पॉईंट वर  दुपारच्या सुमारास करण्यात आली. चिमूर येथे दारू तस्करी होत असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळाली.  पोलिसांनी सापळा रचून हि कार्यवाही केली.  मालेवाडा टी-पॉईंट वर हिरो पॅशन प्रो बिना नंबर गाडी किंमत ४० हजार, हिरो स्प्लेंडर प्लस एमएच - ४० बी पी, ३२६३ गाडी किंमत ४० हजार व २ गाड्यावर ४  पेट्या प्रमाणे एकूण ८ पेटी देशी दारू किंमत ४० हजार असा एकूण १ लाख २० हजाराचा माल जप्त केला असून आरोपी मात्र पसार झालेत.  
 वाहतूक विभागातून मिळालेल्या माहितीनुसार एमएच  -४० , बीपी ३२६३  हि गाडी नागपूर जिल्ह्यातील झाकीर मोहम्मद कादिर यांचे नावे आहे असे निदर्शनास आले असून दुसरी गाडी विना नंबरची आहे. सदर  कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास नीमगडे,  पोलीस शिपाई सचिन गजभिये, पोलीस शिपाई सरकुंडे यांनी केली असून, फरार आरोपीचा शोध सुरु आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-14


Related Photos