नागपूर जि.प.च्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरीष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ नागपूर :
ग्रामपंचायत अंतर्गत समाज भवन बांधकामासाठी निविदा भरून करारनामा करून घेण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याकडून एक हजार रूपयांची लाच घेताना नागपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचा वरीष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
विजय बाजीराव मोरे (५२) असे लाचखोर वरीष्ठ सहाय्यकाचे नाव आहे. तक्रारदार हे नेरला ता. मौदा जि. नागपूर येथील रहिवासी असून ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामपंचायत नेरला येथे आमदार यांचे ‘‘लेखाषिर्ष २५१५ ग्राम विकास कार्याक्रम सन २०१८ - १९ ग्राम विकासाकरीता लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे ग्रामपंचायत मार्फत करणे’’ या मथळया अंतर्गत नेरला ग्रामपंचायत करिता समाज भवन आणि आखाडयाचे बांधकाम मंजुर करण्यात आले. सदर दोन्ही कामाकरीता जिल्हा परिषद नागपूर येथील बांधकाम विभागाषी करारनामा करावा लागतो. तो करारनामा करण्याकरीता निविदा (क्र. १ फार्म) भरुन घ्यावा लागतो. त्याकरीता तक्रारदार हे जिल्हा परिषद नागपूर येथील वरीष्ठ सहाय्यक विजय बाजीराव मोरे यांना भेटून दोन्ही निविदा भरुन करारनामा करुन घेण्याबाबत बोलनी केली असता  वरीष्ठ सहाय्यक विजय मोरे यांनी तक्रारदारास ग्रामपंचायतीकरीता मंजूर झालेल्या समाज भवन व आखाडा बांधकामाचा करारनामा करण्यासाठी  एक हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांना विजय बाजीराव मोरे यांना लाच देण्याची  ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली.  तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून आज १४ जून रोजी सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान वरीष्ठ सहाय्यक विजय  मोरे यांनी  सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद कार्यालय नागपूर येथे लाच  स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द  पोलिस ठाणे सदर, नागपूर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही  पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,  अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक  महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, नापोशि सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, सुनिल हुकरे, चालक पोलिस शिपाई दिनेश धार्मिक यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-14


Related Photos