महत्वाच्या बातम्या

 दक्षिण एक्सप्रेसमध्ये एका आरोपीला दारूसह अटक : बल्लारशाह आरपीएफ आणि जीआरपीची संयुक्त कारवाई 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : २९ सप्टेंबर रोजी ट्रेन क्रमांक १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारू तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारे बल्लारशाह आरपीएफला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाणिज्य निरीक्षक के.के. सेन आणि त्यांचे कर्मचारी बी ७ कोचमध्ये हजर झाले असता इलेक्ट्रिकल मेकॅनिक ग्रेड- २ चे कर्मचारी चेथी व्यंकटप्रसाद वेंकटराजम रा. टिळकनगर विष्णुपुरी काझीपेठ जिल्हा हनवाकोंडा तेलंगणा यांच्या कपाट मध्ये दारू दिसली असता त्यांनी लगेच आरपीएफ व जीआरपी यांना माहिती दिली. 

आरपीएफ व जीआरपी ने संयुक्त झडती घेतली असता पांढऱ्या गोणीत ३० दारूच्या बाटल्या आढळून आल्याने जीआरपी बल्लारशाह यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून अंदाजे १३ हजार २०० रुपये ची दारू जप्त केले. पुढील कारवाई जीआरपी बल्लारशाह पोलीस करत आहेत.

सदर कारवाई आरपीएफ बल्लारशाहचे  पोलीस निरीक्षक पाठक साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश पायघन, हवालदार ललित कुमार यांच्या सुचने नुसार नागपूरचे एएसआय बघेल, जीआरपीचे हेड कॉन्स्टेबल रवींद्र खंडारे व नीलेश निकोडे, बल्लारशाह आरपीएफ व जीआरपी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून जीआरपी बल्लारशाह यांनी १३ हजार २०० रुपयांच्या दारूसह आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos