महत्वाच्या बातम्या

 आरबीआय कडून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदतवाढ 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वाढवली आहे. उद्यापासून २००० रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.

आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही २००० रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल २० हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

आरबीआयनुसार, २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत ९६ टक्के २००० रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या ३.५६ लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत ३.४२ लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.

७ ऑक्टोबरनंतर काय? :

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून बँकांच्या मार्फत नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबवण्यात येणार आहे. ८ ऑक्टोबरपासून आरबीआयने निश्चित केलेल्या केंद्रात २००० रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. याच ठिकाणाहून नोटा बदलून मिळणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos