कांकेर जिल्ह्यातील मेलापूर आणि मुरनार येथे दोन नक्षल्यांचा खात्मा


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलीस जवानांमध्ये गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात  आले आहे. 
रायपूरपासून २०० किमी अंतरावर असलेल्या तडोकी भागातील मेलापूर आणि मुरनार या गावात या नक्षलवाद्यांची सभा होती. या सभेसाठी बरेच नक्षलवादी एकत्र जमले होते. ही बैठक सुरू असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. जिल्हा राखीव पोलीस दलाचे नक्षलविरोधी पथक या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरुवात केली. नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर पोलीस जवानांनी देखील त्याला चोखप्रत्यत्तर दिले. दीड तास ही चकमक सुरू होती. यामध्ये काही नक्षलवादी निसटले. मात्र दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले, अशी माहिती पोलीस महासंचालक (नक्षलविरोधी कारवाई विभाग) गिरधारी नायक यांनी दिली.
दरम्यान, चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केली. यामध्ये दोन एसएलआर रायफल्स, एक ३०३ रायफल आणि एक ३१५ रायफल देखील जप्त करण्यात आल्या आहेत.  Print


News - World | Posted : 2019-06-14


Related Photos