महत्वाच्या बातम्या

 जंगली हत्तींकडुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५० हजार आर्थिक मदत द्या


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : तालुका मुख्यायल्यापासून शेवटच्या टोकावर असलेल्या व कुरखेडा,आरमोरी तालुक्यात येत असलेल्या तब्बल १२ गावातील शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाची जंगली हत्तीच्या कळपाने प्रचंड प्रमाणात नुकसान केली आहे. यामुळे सदर गावातील शेतकरी अधिकच अडचणीत आले असून वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे पाहु जाता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ किमान ५० हजार रुपये प्रती हेक्टर आर्थिक मदत देण्याची मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी राज्याचे वन मंञी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव (ह.)डोंगरगाव, चिखली, विहीरगाव, अरततोंडी तर कुरखेडा तालुक्यातील भगवानपुर, शिरपुर, कराडी, सावलखेडा, खरमतटोला तर आरमोरी तालुक्यातील पळसगाव, जोगीसाखरा येथील शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकात जंगली हत्तीच्या कळपाने उत्पात मांडुन पिकाची नासधूस करण्यासह पिक फस्त केले आहे.शेतात असलेली विंधन विहीर (बोअर)सौर पॅनल, पाईप जवळपास २० ते २५ च्या संख्येने असलेल्या जंगली हत्तीच्या कळपाने नष्ट केले आहे.

वन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या ५ एकराचे जरी वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले तरी २५ हजाराच्या वर नुकसान भरपाई देता नाही जे की अन्यायकारक आहे. उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान पिक हे एकमेव जगण्याचे साधन असुन याच भरोशावर शेतकऱ्यांच्या रोटी बेटी सह वार्षिक आर्थिक नियोजन चालते. उभे धान पिकच नष्ट करण्यात आल्याने व सिंचनाचे साधनही नष्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सद्यास्थितीत जंगली हत्तींचा मुक्काम विहीरगाव शेतशिवार परिसरात असुन शेतपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शेतपिकाचे १०० टक्के नुकसान झाले तरी नुकसान भरपाई देताना एकुण नुकसानीच्या १० टक्केच नुकसान भरपाई देण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिक कर्जाच्या भरोशावर कसलेल्या शेतीचा पिक कर्ज द्यायचा कुठून व जगायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे पाहु जाता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे यथाशिघ्र पंचनामे करून आस्वासनांच्या खैरातीत न अडकवता तत्काळ किमान ५० हजार रुपये प्रती हेक्टर आर्थिक मदत देण्याची मागणी शेडमाके यांनी वन मंञ्यांकडे केली आहे. याबाबत वन मंञी काय निर्णय घेतात याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos