भारताचं अंतराळात स्वत:चं स्पेस स्टेशन बनवण्याची योजना इस्रोत सुरू


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने अंतराळात  भारताचं स्वत:चं स्पेस स्टेशन बनवण्याची योजना  सुरू केली आहे. भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'गगनयान मिशन' चाच हा विस्तार असेल अशी माहिती  इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी  दिली. 
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाविषयी सिवन म्हणाले, 'अवकाशात माणूस पाठवण्याच्या मोहीमेनंतर गगनयान कार्यक्रम सुरूच ठेवायचा आहे. यासाठी भारताचे स्वत:चे अवकाश स्थानक असावे या दृष्टीने इस्रो योजना बनवत आहे.' डिसेंबर २०२१ पर्यंत अवकाशात माणूस पाठवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. गगनयान मोहिमेद्वारे भारताचं हे स्वप्न साकार होणार आहे. जर ठरवलेल्या वेळेत हे उद्दिष्ट आपण गाठू शकलो तर स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागेल, अशी माहिती सिवन यांनी दिली. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गगनयान प्रकल्पाची घोषणा मागील वर्षी केली होती. यावर्षी जुलैमध्ये चंद्रयान २ लाँच होणार आहे. 'चंद्रयान-२' श्रीहरीकोट्ट्यावरून १५ जुलै रोजी मध्यरात्री चंद्राकडे झेपावणार आहे. प्रक्षेपणानंतर काही आठवड्यांमध्ये चंद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. हा चंद्राचा असा भाग आहे, जिथे आतापर्यंत कुठलंच अवकाश यान उतरलेलं नाही.   Print


News - World | Posted : 2019-06-13


Related Photos