चार वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीस अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही :
तालुक्यातील सामदा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या टेकरी गावातील चार वर्षीय चिमुकल्या मुलीवर चॉकलेटचे अमीष दाखवून आरोपीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी संजय मेश्राम  (३६) रा. टेकरी याला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील (सामदा ) टेकरी येथे आरोपीचा पानठेला असून, रविवार दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास त्याच्या पानठेल्याच्या परिसरात मुली खेळत होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र सामसूमच होते. या संधीचा फायदा घेत आरोपीने दुसऱ्या मुलीला घराकडे पाठवले व चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून आपल्या पडक्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पीडितीच्या आईने खिडकीतून बघितले. यावेळी आईने धाव घेत मुलीला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवले व सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. चौकशीअंती सिंदेवाही पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड सहिता ३७६ ( ए ), ३७६ (एबी ) पास्को ४ , ६, १० लै.अ.बा.स नुसार गुन्ह्यांची नोंद करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-13


Related Photos