प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना २४ जुलै पर्यंत घेता येणार भाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  शासनाने खरीप हंगामात २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यांचा निर्णय घेतला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत  २४ जुलै  अशी आहे. 
 अधिसुचित क्षेत्रात ,अधिसुचित पिके घेणारे  ( कुळाने अगर ' भाडेपटृीने शेती करणा-या शेतक-यांसह ) सर्व शेतकरी या योजने‍त भाग घेण्यास पात्र आहेत, गडचिरोली जिल्हयात भात या पिकाकरीता सर्व महसुल मंडळ हे अधिसुचित असुन सोयाबिन पिकाकरीता अहेरी, पेरमिली, आलापल्ली, जिमलगट्टा, मुलेचरा, बामणी आणि कापुस पिकाकरीता  अहेरी, आलापल्ली, जिमलगटा, सिरोंचा, बामणी, पेंटीपाका , असरअल्ली हे अधिसुचित महसुल मंडळ आहेत.
 जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता शासनामार्फत एग्रीकल्चर इन्शुरंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड,  मुंबई, या विमा कंपनीची नेमणुक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हयासाठी या योजनेअंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता   भात  विमा संरक्षित रक्कम  प्रति हेक्टर  ३३ हजार ७५० रुपये असून भरावयाचा पिक विमा हप्ता प्रति हेक्टर  ६७५ आहे.  सोयाबीन  साठी संरक्षित रक्कम  ३३ हजार २५० रुपये असून  भरावयाचा पिक हप्ता ६६५ रुपये,  कापुस  विमा संरक्षित रक्कम  ४३ हजार रुपये व  भरावयाचा पिक विमा हप्ता  २ हजार १५० रुपये आहे. 
 विमा संरक्षणाच्या बाबींमध्ये पिक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या  कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपुर्व /लावणीपुर्व नुकसान भरपाई निश्रिच्त करणे, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्रिच्त करणे ,काढणी पश्राच्त नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती इ.चा समावेश होतो.  योजनेमध्ये सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतक-यांना आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत ( मतदान ओळखपत्र / किसान क्रेडिटकार्ड/ नरेगा जाँबकार्ड/ वाहनचालक परवाना) कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. 
        खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा व फळपिक योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार शेतक-यांनी आपल्या बँकेच्या  कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क साधावा.त्याचप्रमाणे, बिगर कर्जदार शेतक-यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता  आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्याचा क्रमांक अर्जावर नमुद करावा लागणार आहे.
         यासंदर्भात ज्या शेतक-यांकडे अद्यापही आधार कार्ड नाही अशा शेतक-यांनी त्वरीत नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करुन नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करावी.अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळाता यावी व शेतक-यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन येत्या खरीप हंगाम  २०१७ पासुन गांवपातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र  (डिजीटल सेवा केंद्र )  सुविधा शेतक-यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरीता उपलब्ध करण्यात आले आहेत. याकरीता बिगर कर्जदार शेतक-यांनी सदर योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह (७/१२, बँक पासबुक प्रत, आधार कार्ड, पेरणी  दाखला ) नजीकच्या  आपले सरकार  सेवा  केंद्राशी संपर्क साधावा.
 या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधीत बँक, विमा कंपनी   दुरध्वनी क्र. 02261710915 ,( टोल फ्री क्रमांक - 1800116515 ) तालुका कृषि अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांचेशी संर्पक साधावा .  जास्तीत जास्त शेतक-यांनी सदर योजनेत  २४ जूलै पूर्वी सहभागी होण्याचे आवाहन  जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी  अनंत पोटे यांनी केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-13


Related Photos