१५ जुन रोजी चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार, सतर्कतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयातील चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५  कि.मी. अंतरावर असेल्या  चिचडोह बॅरेजचे बांधकाम पुर्ण झाले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदिच्या  वरच्या बाजूस ४ कि.मी. वर आहे. बॅरेजचे एकुण ३८ दरवाजे १२ ऑक्टोंबर २०१८ पासून बंद करण्यात आले आहेत.आता पावसाळा सुरु होत असल्यामुळे  बॅरेज मध्ये साठविलेल्या पाणीसाठा कमी करुन सर्व ३८ दरवाजे  १५  जून  रोजी उघडण्याचे नियोजित आहे. यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 दरवाजे उघडल्यानंतर नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जिवीत व वित्त हानी होवू नये म्हणून लगतचे गावांना / ग्रामपंचातींना सुचना देण्यात आल्या आहेत.  नदी काठावर जाणे टाळावे तसेच नदिकाठावरील शेतामधील कामे करतांना सतर्क रहावे. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करताना, मासेमारी करणारे, नदीघाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-13


Related Photos