वायू चक्रीवादळ काही तासांत तीव्र स्वरूप धारण करणार, विदर्भात १६ ते १८ जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 वायू  चक्रीवादळ मुंबईपासून ५०० किमी अंतरावर असून, शंभर ते १२५ किमी वेगाने पसरत असून, ते पुढील काही तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करणार आहे. आज १३ जून रोजी हे वादळ  पोरबंदरला धडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे विदर्भात १६ ते १८ जून दरम्यान बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी  वर्तविली आहे.
  बुधवार, गुरुवारी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १५ जूनला विदर्भात बहुतांश जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळणार असून, चक्रीवादळ वायू मुंबईपासून ५०० किमी. नैऋत्त्येला आहे. हे वादळ पुढील सहा तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. तसेच हे वादळ शंभर ते १२५ किमी. वेगाने १३ जूनला पोरबंदर (गुजरात) ला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभवामुळे मुंबईत जोरदार पाऊस पडत असून, त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून शनिवारच्या आसपास धडक देण्याची दाट शक्यता आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-13


Related Photos