महत्वाच्या बातम्या

 एकदिवसीय रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


- ३१ उमेदवारांची अंतिम निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर व नॅशनल करीअर सर्विस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित एकदिवसीय रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथे आयोजित  रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून Avensten Technology या कंपनीमार्फत BUSINESS DEVELOPMENT EXECUTIVE, SALES EXECUTIVE, ELECTRICIAN, WELDER आदी पदांसाठी एकूण ५० रिक्तपदांसाठी उद्योजकांमार्फत शैक्षिणक कागदपत्राची तपासणी करून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील उमेदवारांनी उस्फूर्त प्रतिसाद देवून उपस्थिती नोंदविली. या  (Placement Drive) मध्ये एकूण ६० उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली. त्यापैकी ३१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात येऊन त्यांची दुसऱ्या फेरीसाठी अंतिम निवड झाली.

या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली यंग प्रोफेशनल, नॅशनल करीअर सर्विस, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथील  अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.  





  Print






News - Nagpur




Related Photos