महत्वाच्या बातम्या

 ज्येष्ठ नागरिक दिनानिमीत्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


- ज्येष्ठ नागरिकांनी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय, यांचे संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, जि.प. चौक, येथे १ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळातील जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक/ मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण निर्गमीत करण्यात आलेले आहे. शासन परिपत्रक २६ सप्टेंबर २०२३ नुसार १ ऑक्टोंबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस (International Day of Older Person) साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिकांकरीता आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात विविध व्यांधीच्या LFT. KFT, Lipid Profile, Bllood Sugar. BhAIC, CBC, Blood Pressure इत्यादी तपासण्या डॉ. रत्नाकर बांडेबुचे, डॉ. शैलेश कुकडे व त्यांच्या तज्ञ चमूकडून करण्यात येणार आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos