वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा ची ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
वर्ल्डकपमधून  दोन दिवसांची रजा घेत वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा याने  बुधवारी    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली.  
आठवडाभरापूर्वी भारताचा गोलंदाज अनिल कुंबळे ताडोबात येऊन गेला होता. ताडोबातील जंगलाचे आणि वाघाचे फोटो त्याने लाराला दाखवले. ते फोटो पाहून लारा  प्रभावित झाला. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये लारा समालोचन करत आहे. या व्यस्तवेळपत्रकातून त्याने वेळ काढला आणि थेट चंद्रपूरमध्ये पोहोचला.  मंगळवारी रात्री लारा ताडोबात पोहोचला. त्याने कोलारा गेटवरील गेस्टहाऊसला मुक्काम केला. बुधवारी सकाळी तो सफारीला निघाला. तेव्हा वाघासह अस्वल, रानकुत्रे असे अनेक प्राणी त्याला दिसले. अनेक पक्षीही त्याने पाहिले. ताडोबाचे जंगल त्याला इतके आवडले की  ‘हे जंगल पाहून धन्य झालो’ असे तो म्हणाला.   सकाळच्या सफारीनंतर तो वनविभागाच्या रेस्टहाऊसला आला. याठिकाणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गुरुप्रसाद यांनी त्याला ताडोबावरील पुस्तक भेट दिले आणि त्याचा सत्कार केला.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-12


Related Photos