महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जातीमधील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती तात्काळ द्या : उलगुलान संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधीछात्रवृत्ति BANRF शैक्षणिक वर्ष २०२२ या योजनेचे पत्रताधारक संशोधक विद्यार्थी असून त्यांना शासनाच्या नाकर्तेपणामुळे अधीछात्रवृत्ति पासून वंचित ठेवण्यात आले आहे. याउलट याच विभागाअंतर्गत येत असलेल्या सारथी आणि महाज्योति आणि आदिवासी विकास विभागातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मजूर करण्यात आली आहे. हा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय असून सर्व संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती तात्काळ द्या, अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली असून तसे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.

शासनाने विद्यार्थीसोबत जातीवाद केला असून जाणीवपूर्वक या योजनेच्या लाभापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा घाट रचला आहे. महाराष्ट्रासारख्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात असे घडणे अतिशय निंदनीय असून सामाजिक न्याय विभागानेच विद्यार्थ्यांवर अन्याय केला असून तात्काळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी राजू झोडे, श्याम झिलपे, प्रफुल्ल मेश्राम यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos