चामोर्शी - आष्टी मार्गावर कोनसरी जवळ मोठमोठे खड्डे, बांधकाम विभागाचे दूर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
छत्तीसगड ते तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होणाऱ्या चामोर्शी - आष्टी मार्गाच्या नशिबी उपेक्षाच असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर कोनसरी जवळ मागील तीन  महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले असून याकडे बांधकाम विभागाचे दूर्लक्ष होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून आरमोरी - गडचिरोली - चामोर्शी - आष्टी तसेच धानोरा मार्गावरून छत्तीसगड राज्यातून येणारी जड वाहने रात्रंदिवस आवागमन करतात. यामुळे गडचिरोली - चामोर्शी - आष्टी या मार्गावर प्रचंड खड्डे पडले. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र कोनसरी गावाजवळील खड्डे बुजविण्यात आले नाही. यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या मार्गाची दुरूस्ती करावी अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहूजन समाज पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष क्रिष्णा वाघाडे यांनी दिला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-12


Related Photos