महत्वाच्या बातम्या

 सरकारकडून ओबीसींना फसवण्याचा प्लान : वडेट्टीवार सरकारवर बरसले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मराठा समाजाच्या प्रश्नाला घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली. त्यावर चर्चा झाली. मात्र जेव्हा ओबीसींचा प्रश्न येतो तेव्हा मुख्यमंत्री भाजपच्या लोकांना घेऊन बैठक लावतात.

ओबीसीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि सरकार गंभीर आहे काय? असा थेट सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

चंद्रपुरात ओबीसी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळाला वडेट्टीवार यांनी आज भेट दिली. या आंदोलनाची सरकारने अद्यापही दखल घेतली नाही त्यामुळे वडेट्टीवार आक्रमक दिसलेत. सरकारवर ताशेरे ओढताना वडेट्टीवार म्हणाले, जी बैठक घेतली ती गोंधळलेल्या सरकारचा नवा गोंधळ आहे. ओबीसी समाज असो की कुठलाही समाज असो त्यांचे प्रश्न सोडवताना सर्वांना सोबत घेऊन सोडवायला हवा. या सरकारचा काहीतरी वेगळा डाव आहे. ओबीसींना फसवण्याची या सरकारने नवीन योजना आखली आहे. या बैठकीवर इतरांनी बहिष्कार टाकायला पाहिजे. जोपर्यंत सर्वपक्षीय बैठक होत नाही तोपर्यंत कुणीही त्या बैठकीला जाऊ नये, असे पुढे वडेट्टीवार म्हणाले.

जे कधीच ओबीसीसाठी लढले नाही. ओबीसींसाठी जे रात्र दिवस लढतात त्यांना तुम्ही का बोलावले नाही हा प्रश्न आहे. सरकार कशाला तोंड लपवत आहे, असा सवालही त्यांनी केला





  Print






News - Chandrapur




Related Photos