मुल येथील ग्रेटा कंपनीत आग , लाखोंचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
  मरेगाव परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महा मंडळाच्या आवारात असलेल्या ग्रेटा कंपनीत काल ११ जून रोजी दुपारी तीन  वाजताच्या सुमारास आग लागली.  ही आग कोळसा वाहून नेणाऱ्या  मशीनरीमुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीत येथिल लाखो रुपयांचे नुकसान झाले.
ग्रेटा कंपनीत वीज निर्मिती केल्या जाते . त्यासाठी येथे दगडी कोळश्या बरोबर लाकूड , धानाचा कोंढा , लाकडी पाट्या आणि लाकडाचा भूसा यांचा वापर केल्या जातो. कोळसा वाहून नेणाऱ्या  एका कोल क्रेशर मशीन मधून शार्ट सर्किट सुरु झाल्याने त्याची ठिणगी कोंढा आणि लाकडाच्या भुशावर पडल्याने आगीने रुद्र रुप धारन केले. जवळच लाकूड फाटा असल्याने आग चांगलीच पसरली.  
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मूल, चंद्रपूर आणि बल्लारपूर येथिल अग्निशमन दलाची वाहने कार्यरत होती . आगीवर  नियंत्रणासाठी तालुका प्रशासन, आणि कंपनी चे अधिकारी लक्ष ठेवून होते .  यात कोणतीही जीवित हानि झाली नाही . कंपनी च्या जवळच मरेगाव गाव असल्याने आग विझविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करण्यात आले. मात्र कंपनी चे लाखो रुपयांचे   नुकसान झाले . येथिल मशीनरी,लाकुड फाट्याला मोठा फटका बसला.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-12


Related Photos