महत्वाच्या बातम्या

 ३ ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी व तालुकास्तरावर लोकशाही दिन राबविण्यात येतो. परंतु २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती असल्यामुळे तसेच शासकीय सुट्टी असल्याने लगतच्या दिवशी लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १.००  वाजता आयोजित करण्यात आला आहे.

लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. असे निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी कळवले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos