बचत गटातील शेतकरी महिला आणि पुरुषांना दिले प्रशिक्षण


- माविम आणि मानव विकास मिशन गडचिरोली चा पुढाकार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली , मानव विकास मिशन गडचिरोली आणि जीवनज्योती लोक संचालीत साधन केंद्र वैरागड येथे लोक संचालित साधन केंद्राच्या कार्यालयामध्ये   १० जुन रोजी  बचत  गटातील शेतकरी महिला   तसेच पुरुषांकरिता  १ दिवसीय सगुणा पिक लागवड तंञज्ञान प्रकल्प या शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी जीवनज्योती लोक संचालीत साधन केंद्राच्या सचिव संगीताताई हुररे  होत्या.  उद्घाटक  म्हणून  तालुका कृषी अधिकारी संदीप धोने   होते. तर मार्गदर्शक म्हणून  कृषी विभागाचे पर्यवेक्षक जी.एन.जाधवर , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा वैरागड चे शाखा व्यवस्थापक पद्माकर शेबे , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा वैरागड चे निरीक्षक सेकवदास दरवे , आरमोरी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी  विलास चॊधरी ,  पी.एस.सी  जांभूळकर  आरमोरी, ज्ञानदीप लोक संचालित साधन केंद्र आरमोरी च्या  व्यवस्थापक  विद्याताई मेश्राम उपस्थित होते.
बचत गटातील महिलांनी उन्नती आणि तिची आरथीक परीस्थिती सुधारण्याकरिता ती आणि तिच्या कुटुंबीयांनी प्रगती कडे कशी वाटचाल करावी. महिलांनी आता चुल आणि मूल इतकेच मर्यादीत न राहता,चाकोरीबध्द जीवनाला झुगारून समोर यायला पाहिजे कारण आता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे असेल तर जसे घर दोघांचे अभियान,शेतीच्या ७/१२ वर महिलांचे नाव आणी इतर शासकिय योजनांचा लाभ घेतांना कुटुंबामध्ये पुरूष वर्गानी पण तिचे मत, तिचे विचार जानले पाहिजेत आणि आम्ही आमच्या लोक संचालित साधन केंद्राकडून वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या योजना तुमच्या गावापर्यत कुटुंबापर्यंत पोहचवितोय. मग त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे म्हणजेच शासन आपल्या दारी आहे म्हणून आलेल्या संधीचे सोने करून घ्यावेत असे जीवनज्योती लोक संचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक यामीनीताई मातेरे यांनी आपल्या प्रास्ताविक मधून सांगितले.
  कार्यक्रमाचे मार्गदर्शक  धोने  , जाधवर  , चौधरी   , .शेबे  , दरवे   यांनी महिलांना आपण आता आधुनिक पद्धतीकडे वळलो पाहिजे.  या सगुणा पिक लागवड ताञीक पद्धतीने लागवड करित असतांना पैशाची बचत,वेळेची बचत,श्रमाची बचत,शारीरिक दुट्टया होणारा ञास इ.गोष्टीपासुन फायदा होतो.गावातील शेतकऱ्यांच्या परिस्थिती बाबत चर्चा,दशपरणी अरक आणि त्याचे महत्त्व,माती परिेक्षण,अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या जाती आणि त्यांचे गुणधर्म,सेदिय शेतीबाबत माहिती इत्यादी बाबतीत सुस्पष्ट आणी एकदम खेळीमेळीच्या वातावरणात  अतिशय  मोलाचे असे मार्गदर्शन केले.या कार्याशाळेला एकूण १५ गावातिल ३६ शेतकरी  महिला  आणि पुरुष  उपस्थित होते. 
  कार्यक्रमाचे संचालन क्षमतावुद्धी समन्वयक रुंदाताई सहारे  यांनी केले तर आभार जीवनज्योती लोक संचालित साधन केंद्र वैरागड  चे लेखापाल सुरेश बावनकर   यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता कार्यकारणी सदस्य,महिला बचत गटाच्या शेतकरी भगिनी आणि बंधू यांनी सहकार्य केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-11


Related Photos