हिंदेवाडा येथे व्यसनमुक्त समाज आणि आर्थिक उन्नतीवर मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील हिंदेवाडा येथे कुक्कामेटा, इरपनार आणि पिटेकसा येथील बचत ग्रामसंघ गटाची बैठक घेण्यात आली. बैठकीला चार गावांतील ५५ महिला उपस्थित होत्या. या बैठकीत मुक्तिपथ द्वारे महिलांना व्यसनमुक्त कुटुंब आर्थिक प्रगती कशी सध्या करू शकते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उमेद च्या प्रभाग समन्वयक स्मिता आडे,  जि. प. सदस्य गोई ताई कोडापे यांचीही उपोस्थिती होती.
 आदिवासी बहुल असलेल्या भामरागड तालुक्यात मोहाची दारू मोठ्या प्रमाणात पिली जाते. याचा विपरित परिणाम पुरुषांच्या कार्यशक्तीवर होतो. त्यामुळे या भागातील महिला मोठ्या प्रमाणात कष्टाची कामे करून घराला हातभार लावतात. बचत गटांद्वारे पैशाचा संग्रह करून आपली आणि कुटुंबाची उन्नती साध्य करण्याचा मार्ग त्यांना सापडत आहे. पण बायकोने कमविलेला पैसा दारूमध्ये उडविणारे पुरुष अनेक गावांमध्ये सापडतात. काही ठिकाणी महिलादेखील दारू पिताना दिसतात. परिणामी दारूमुळे आर्थी स्थैर्य खालावते. यावर मार्ग काढण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमुने बैठकीत उपस्थित महिलांशी चर्चा केली. महिलांनीही दारूमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीचा पाढा वाचून दाखविला. हे नुकसान टाळण्यासाठी महिलांनी स्वतः व्यसनमुक्त राहून कुटुंबातील सदस्यांचे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी सांगण्यात आले. त्याचबरोबर गावातील खर्रा व दारू विक्री बंद करणे, बचत कलश योजनेनुसार स्वतःचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणे याविषयी माहिती मुक्तिपथ द्वारे देण्यात आली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-11


Related Photos