एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय नराधमाचा बलात्कार, वाडी येथील घटना , आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना  वाडी  येथे घडली  आहे . भूषण डहाट असं या नराधमाने   चार वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवला आणि तिच्यावर बलात्कार केला असे पोलिसांनी म्हटले आहे. 
 एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. नागपूर अमरावती रस्त्यावर असलेल्या एका प्राथमिक शाळेच्या आवारात ही घटना घडली. पीडित मुलीची आई परिसरातल्या इमारतींमध्ये धुणे-भांड्यांची कामं करते. सोमवारी दुपारी ही मुलगी खेळत असताना तिथे भूषण आला आणि या मुलीला एका खोलीत घेऊन गेला. तिथे अश्लील व्हिडिओ दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. संध्याकाळी पीडित मुलीच्या आईने मुलीच्या अंगावर काही खुणा पाहिल्या. ज्यानंतर तिने मुलीला याबाबत विचारले असता तिने जे काही घडले ते सांगितले. पीडित मुलीच्या आईने भूषणला फोन करण्याचाही प्रयत्न केला मात्र तो फोन बंद करून फरार झाला आहे. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-11


Related Photos