महत्वाच्या बातम्या

 महिला बचत गट व सामान्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राची तत्परता : खासदार रामदास तडस


- नगर परिषद देवळी व्दारा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया व पथविक्रेता लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : महिला बचत गटाचे सक्षमीकरण तसेच झोपडीत राहणाऱ्या सामान्य माणसाच्या उत्थानासाठी केंद्र शासनाची तत्परता राहिली आहे. केंद्र सरकारने बचत गटातील महिलासाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना तसेच फेरीवाल्यासाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजना कार्यान्वीत करुन त्यांना बळ देण्याचे कार्य केलेले असुन त्यांना लाभ मिळत आहे, केन्द्रसरकारने महिलांच्या हितासाठी अनेक योजना व विधेयक आणले आहे. महिलांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला आरक्षण विधेयक व इतर योजना कार्यान्वित करून चालना दिली जात असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया व प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर च्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

आज भारत रत्न अटल बिहारी बाचपेयी सभागृह देवळी येथे नगर परिषद देवळी व्दारा केंद्र शासनाच्या विविध योजने अंतर्गत धनादेश वाटप, परिचय पत्र वाटप व मंजूरी पत्र वाटप कार्यक्रम वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, कार्यक्रमाला मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे, माजी उपाध्यक्ष डॉ. नरेन्द्र मदनकर, माजी सभापती नंदकिशोर वैद्य उपस्थित होते.

कार्यक्रमात दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाच्या महिला बचत गटांत देवळीच्या माहेश्वरी महिला बचत गट देवळीला शेवई उद्योगासाठी रु. १ लाख ६० हजार, विशाखा महिला बचत गट देवळी ला पापड गृह उद्योगासाठी रू. २ लाख ४० हजार,  संघमित्रा महिला बचत गट देवळी ला शेवई गृह उद्योगासाठी रु. १ लाख ८० हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. सोबतच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेअंतर्गत बारकु वाघाडे, प्रफुल टिपले, पुरुषोत्तम कोहाटे, रवींद्र नागपुरे, अश्विनी चावरे, लक्ष्मी चावरे, सपना फटींग, प्रतिभा चांभारे, प्रतिभा फटींग, जगदीश काळे आदीं फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजाराचा धनादेश देण्यात आला. या योजनेनुसार भाजीपाला व फळे विक्रेते, चहा कॅन्टीन व्यवसायी तसेच रस्त्यावर दुकान थाटणाऱ्याना फेरीवाल्यांना कमी व्याजदराने पैसे उपलब्ध करून देण्यात आले. यानंतर संबंधित व्यावसायिकांचा आर्थिक व्यवहार तपासून त्यांना उर्वरित २० हजार व ५० हजार दोन टप्प्यात दिले जाणार आहे. नगरपरिषद देवळी ला याअगोदर २२८ व आता ३८६ फेरीवाल्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे त्यापैकी आतापर्यंत २२१ फेरीवाल्यांना लाभ देण्यात आला.

प्रास्तावीक मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे, कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी उमेश नरड यांनी केले तसेच आभारप्रदर्शन समूह संसाधनच्या प्रतिभा कापसे यांनी केले. यावेळी महिला युवती शहर स्तर संघाच्या अध्यक्ष विशाखा वंजारी, सचिव छाया तडस तसेच कार्यालय अधीक्षक देवेंद्र निकोसे, सुनील ताकसांडे, अलोने, कोरडे, पिसे, तडस, नांदूरकर, झिलपे तसेच समूह संसाधनच्या महिला, नगर परिषदेचे कर्मचारी व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos