महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात उद्योग क्रांती घडविल्याशिवाय थांबणार नाही : आ. देवराव होळी


- मेक इन गडचिरोली अंतर्गत नंदिनी ब्रिक्स प्लांट चे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते भूमिपूजन

- मेक इन गडचिरोली अंतर्गत नव उद्योग सुरु होत असल्याचा आनंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उद्योग क्रांती व्हावी याकरिता आपण मागील काही वर्षापासून सतत प्रयत्न करीत असून मागील काळात मिळालेल्या एम. आय. डी. सी. प्लॉट मध्ये आता उद्योग सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. ही अतिशय आनंदाची बाब असून जोपर्यंत जिल्ह्यात उद्योग क्रांती घडवून येणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गडचिरोली येथील नंदिनी इंडस्ट्रीज  ब्रिक्स प्लांट चे भूमिपूजन करताना केले. 

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, गडचिरोलीचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमखे, भाजपाचे नेते अनिल पोहनकर, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, इंडस्ट्रीचे प्लॅनर मनीष परतानी, इंजिनियर राहुल रोहनकर, घनश्याम पाटील मस्के मारकबोडीचे माजी उपसरपंच रुपेश चुधरी, किशोर हजारे, सुरज श्रीवास्तव ,सुरेश जनबंधू, ब्रिक्स प्लांटचे संचालक दिलीप मस्के प्रामुख्याने उपस्थित होते. 

आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या प्रयत्नातून मेक इन गडचिरोली अंतर्गत सदर प्लॉट ब्रिक्स निर्मिती  करिता आरक्षित करण्यात आला. त्यानुसार या प्लॉटवर आज आमदार महोदयांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग निर्मिती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून जोपर्यंत जिल्ह्यात उद्योग क्रांती येणार नाही, तोपर्यंत आपण  उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न सुरूच ठेवू असे ते म्हणाले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos