महत्वाच्या बातम्या

 योगिता पिपरे यांची प्रथमत:च महिला भाजपा जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीची नुकतीच नवनियुक्त जिल्हा कार्यकारीनी जाहीर करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रथमत:च जिल्हा महामंत्री पदी महिला म्हणून योगिता पिपरे यांची निवड करण्यात आली.

योगीता पिपरे नगराध्यक्ष असतांना गडचिरोली शहरात अनेक विविध विकासात्मक कामे सामाजिक कामे करून पक्षाचे नाव मोठे केले. महिला आघाडी प्रभारी जिल्हाध्यक्ष असतांना भाजप पक्षवाढीसाठी संपूर्ण जिल्हाभर प्रवास केला. भारतीय जनता पार्टी व महिला आघाडीच्या वतीने जे काम सोपविले ते काम पूर्ण निष्ठेने भाजपवाढी साठी जिल्ह्यात काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्या कार्याचे फळ म्हणुन पक्षश्रेष्ठींनी त्यांना जिल्हा महामंत्री पद दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने नुकताच नारीशक्ती वंदन अधिनियमला संसदेत मंजुरी मिळालेली आहे. यापूर्वी स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण होते परंतु आता विधानसभा व लोकसभेमध्ये सुद्धा महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.  

गडचिरोली जिल्ह्यांमध्ये यापूर्वी जिल्हा महामंत्री पदी फक्त पुरुषांचिंच वर्णी असायची परंतु योगीता पिपरे या प्रथम महिला आहेत. ज्यांची भाजपा जिल्हा महामंत्री पदी निवड झालेली आहे.

त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, रवींद्र ओल्लारवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos