शेती कामांची लगबग सुरू : आता प्रतीक्षा केवळ पावसाची


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका  प्रतिनिधी / मुल :
खरीप हंगाम जवळ आला आहे. मृग ऩक्षत्र लागले तरी पावसाचा पत्ता नाही. हंगामातील लागवडीसाठी पाऊस पडण्यापूर्वी शेतीची कामे आटपावी लागत असल्याने शेतकऱ्यांची लगबग  सुरू आहे. तालुक्यात लावगडीखाली हजार हेक्टर क्षेत्र असून त्यावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. त्यामूळे शेती मशागतीच्या पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे.
 मागील वर्षीचा हंगाम लवकर संपला. खरीप हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांनी  शेतीची नांगरणी,वखरणी करून ठेवली. उन्हाळयात शेताला कडक उन्हाचा चांगला फायदा व्हावा,यासाठी अगोदरच नांगरणी करण्यात येते. त्याचबरोबर धुरा साफ करणे,कुंपणाासाठी काटे तोडून ठेवणे,शेतात शेणखत टाकणे,अशा प्रकारची कामे उन्हाळभर सुरू असतात. आता जसजसा खरीप हंगाम जवळ येत आहे. तस - तशी शेतकऱ्यांची  लगबग वाढली आहे. कारण पाऊस पडण्यापर्वूी शेतकऱ्यांना  अनेक कामे करावी लागतात. पाऊस पडल्यानंतर अनेक गावात रस्त्याअभावी वाहने जाऊ शकत नाही. त्यामूळे यापूर्वीच खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार नियोजन करण्यात येते.   बियाणे खतांची खरेदी केल्या जाते. त्यामूळे शेतक-यांच्या दुष्टीने हा अतिशय महत्वाचा काळ समजला जातो. या काळात थोडेजरी नियोजन चुकले तरी त्याचा फटका वर्षभर सोसावा लागू शकतो. त्यामूळे आतापासूनच शेतकरी बांधव खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.     Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-10


Related Photos