आलापल्लीजवळ तेंदुपत्त्याने भरलेला ट्रक जळून खाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
तेंदुपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदुपत्त्यासह ट्रक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना आज १०  जून रोजी आलापल्ली - आष्टी मार्गावर आलापल्लीजवळ घडली आहे. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता अशी माहिती आहे. 
सध्या जिल्ह्यातून तेदुपत्त्याची वाहतूक सुरू आहे. ट्रकमध्ये उंच उंच पोती भरून वाहतूक केली जात आहे. आज असाच एक ट्रक वेलगूर येथून तेंदुपत्ता घेवून जात असताना वीज तारांचा स्पर्श झाल्याने  अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या बाजूला घेत उभा केला. तेंदुपत्त्याला आगीने कवेत घेतल्याने काही वेळातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-10


Related Photos