शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारला जागा दाखवू : राजू झोडे


- बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  महाराष्ट्र सरकार जाणिवपुर्वक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे. विकासाच्या नावाने  खोटी जाहीरातबाजी करणाऱ्या पालकमंत्र्यानी  चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांशेतकऱ्यांसाठी   आजपर्यंत काय केले  ते जाहीर करावे.   शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारला जागा दाखवून देऊ असा इशारा बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांनी दिला आहे. 
बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने शेतकऱ्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रसंगी  बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश  राजू झोडे बोलत होते.  
पुढे ते म्हणाले , शेतकरी बांधव आजघडीला मोठ्या आर्थिक प्रपंचात भरडला जात आहे. कित्येक वर्षापासुन शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमीनीला या काँग्रेस , भाजपच्या  सरकारने पट्टे देण्याचे नाकारले आहे. जबरान जोत शेतकरी आजघडीला माझी  जमीन जाईल या दहशती खाली  जगत आहे. हे शासन जबरान जोत शेतकऱ्यांची जमीन हिसकावन्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. तरी जबारनजोत शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पट्टे द्यावे. राज्यातील शेतीविषयक धोरण ,सरसकट कर्ज माफी करावी,शेतपिकाला हमीभाव च्या दुपट भाव घ्या,शेतकरी आत्महत्या ,जमीन वाटप,गायरान जमीनीचे प्रश्न राज्यातिल ४१, ७३, ७०१ भुमिहीन शेतमजुरांचे प्रश्न ,शेती व शेततळी यांचेशी सबंधीत प्रश्न , स्वामीनाथन आयोग लागु करण्याचा प्रश्न असो सरकार शेतकरी बांधवांबद्दल दुजाभाव करतांना दिसत आहे.
शेतकरी राजा आयुष्यभर राबुन जगाचे पोट भरतो त्याच बळीराजाला आयुष्याच्या शेवटी दोन घास खायला मिळत नाही ही आजची परिस्थीती आहे .त्या माझ्या बळीराजाला किमान वयाच्या ६० वर्षानंतर मासिक ५ हजार  रु पेंशन देण्यात य़ावे.  गोसेखुर्द धराणाची पाण्याची व्याप्ती वाढवुन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे , तसेच ईतर जलसाठ्यातुन पाणी मुबलत उपलब्ध करु देण्यात यावे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे व निशुल्क नविन  विजजोडनी करुन द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांना विनाअट कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे व योग्य बाजारपेठ तयार करावी . किटकनाशकामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये सानुग्रह निधी देण्यात यावा व सबंधीतावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. जमीन हद्द शासनाने त्वरीत मोजुन ती कायम करावी अशा विविध मागण्यांना घेऊन बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांच्या नेतृत्वात आज धरणे आंदोलन करण्यात आले.   मागण्या पुर्ण झाल्या नाही तर याहीपेक्षा तिव्र आंदोलन करण्याच्या ईशारा राजु झोडे यांनी दिला.
सदर धरणे आंदोलनात  संजय मगर बिआरव्हीएम विदर्भ संयोजक, संजय बोधे लोकसभाध्यक्ष चंद्रपूर, ईंजी.मोनल  भडके,अजय लिहीतकर,राजु रामटेके,महेंन्द्र झाडे,संजय वानखेडे,संपत कोरडे,रुषी पेटकुले,.संजय भडके,अमित नळे,मितवा पाटील,जिवने ,खोब्रागडे,चंद्रकांत माझी तसेच असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थीत होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-10


Related Photos