प्रवासी महिलेने वॉशरूम समजून उघडले विमानाचे इमर्जन्सी गेट


वृत्तसंस्था / इस्लामाबाद :  पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमध्ये प्रवासी महिलेने वॉशरूम समजून इमर्जन्सी गेट उघडले.  सुदैवाने विमान तेव्हा रनवेवर असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.  मात्र विमानात एकच गदारोळ उडाला. 
‘पीआयए’चे हे विमान मँचेस्टर विमानतळाकरील रनवेवर उभे होते, तेव्हा ही घटना घडली. महिला प्रवाशाने एक बटन दाबले आणि आपत्कालीन दरवाजा उघडला. ‘पीआयए’च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पीआयएच्या मँचेस्टर उड्डाणापूर्वी एका महिला प्रवाशाने चुकून विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. या घटनेमुळे या विमानाच्या टेकऑफला सात तास विलंब झाला. अशा घटनेनंतर आवश्यक अशी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ४० प्रवाशांना त्यांच्या सामानासह सदर विमानातून उतरविण्यात आले. त्यांची व्यवस्था विमानतळा जवळील हॉटेलमध्ये करण्यात आली. नंतर त्यांना अन्य विमानाने पाठविण्यात  आले.    Print


News - World | Posted : 2019-06-10


Related Photos