सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी येथे बिबट्याने घेतला तिसरा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही :
  तालुका मुख्यालयापासून   अवघ्या ५  किमीवर असलेल्या मुरमाडी येथे बिबट्याने तिसरा बळी घेतला. रविवारी सायंकाळच्या सुमारास गुरे चराई करून जंगलातून परतणाऱ्या तुळशीराम पेंदाम (६५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि दूरवर फरफटत नेऊन मारले. तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ माजविला असून ९ महिन्यांच्या बाळाचा तसेच वृद्धेचा बळी घेतल्यानंतर  या आठ दिवसातील ही तीसरी घटना आहे.
यापूर्वी याच तालुक्यात गडबोरी इथे दोन जणांचा बळी बिबट्याने घेतला. मुरमाडी येथील घटनेनंतर लोकांमध्ये रोष आहे. जोपर्यंत पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाही, थेट कारवाईचे आदेश देत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली होती. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-10


Related Photos