महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२६ सप्टेंबर महत्वाच्या घटना

४६ : ४६ इ.स.पू.: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.

१७७७ : अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.

१९०५ : अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.

१९१० : त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.

१९५० : इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९५४ : जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.

१९६० : फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

१९७३ : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

१९८४ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

१९९० : रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९७ : गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.

२००१ : सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

२००९ : टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.

२६ सप्टेंबर जन्म

१८२० : पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

१८४९ : नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)

१८५८ : लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)

१८७० : डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.

१८७६ : भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)

१८८८ : अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)

१८९४ : प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)

१९०९ : नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)

१९१८ : मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)

१९२३ : भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)

१९२७ : गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००७)

१९३१ : भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)

१९३२ : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.

१९४३ : ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.

१९७२ : न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू मार्क हॅस्लाम यांचा जन्म.

१९८१ : अमेरिकन टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांचा जन्म.

२६ सप्टेंबर मृत्यू

१९०२ : लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)

१९५२ : स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.

१९५६ : भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)

१९७७ : भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)

१९८८ : रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)

१९८९ : गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)

१९९६ : मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)

२००२ : मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)

२००८ : अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos