जनहितासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी


- तिरुपती बालाजीचे घेतले दर्शन 
वृत्तसंस्था / अमरावती : 
आंध्र प्रदेशातील जनतेसाठी केंद्र सरकार येथील सरकारला मदत करण्यास सदैव तयार आहे. जनहितासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहणार आहोत. आम्हाला सरकारही बनावयाचे आहे व देशही घडवायचा आहे. सरकारचा उपयोगही देश घडवण्यासाठीच झाला पाहिजे. पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करणे आमचा स्वभाव नाही व विचारही नाही. असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेशमधील सभेत बोलताना म्हटले. 
सभेनंतर मोदींनी तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. याप्रसंगी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची उपस्थिती होती. 
श्रीलंका दौरा आटोपून आंध्र प्रदेश येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रविवारी येथील विमानतळावर मुख्यमंत्री जगनामोहन रेड्डी यांनी स्वागत केले. एवढेच नाहीर मुख्यमंत्री रेड्डी यांनी मोदींच्या पाया पडत त्यांचे आशिर्वादही घेतले. यानंतर सभेप्रसंगी  मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे देखील नक्कीच आंध्र प्रदेशाला पुढे घेऊन जातील. तर भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक करत आम्ही भाजपा कार्यकर्ते केवळ निवडणुका आल्यावरच मैदानात उतरणारे लोक नाही, तर आम्ही सदैव जनतेच्या सुखा दुखात त्यांच्या बरोबर राहतो. असे त्यांनी सांगितले.



  Print






News - World | Posted : 2019-06-09






Related Photos