नागपूर शहर वाहतूक शाखेतील शिपायासह एकास अवैध दारू तस्करी प्रकरणी अटक


- वरोरा पोलिसांची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
नागपूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत एका शिपायासह त्याच्या साथीदाराला दारू तस्करी करताना वरोरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून वाहनासह ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुळ भद्रावती येथील असलेला सचिन विनायक हांडे हा नागपूर येथील सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. सचिन हांडे हा त्याचा सहकारी प्रणव हेमंत म्हैसकर रा. मानकापूर नागपूर याच्यासह आज ९ जून रोजी सकाळी एमएच ३१ ई यु ४८७३ क्रमांकाच्या एस क्राॅस कारने दारू तस्करी होता. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात चार लाख रूपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. 
सदर कारवाई वरोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मांडवे, धनराज फरकाडे, श्रीकांत नागोसे, निखिल कौरासे, मंगेश शेंडे, वाहन चालक भोयर यांनी केली आहे. पोलिसच दारू तस्करीच्या प्रकरणात अडकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-09


Related Photos