वनश्री महाविद्यालय कोरची ला गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट रासेयो एकक पुरस्कार जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची
: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे रासेयोत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या रासेयो एकक व कार्यक्रम अधिकारी यांना दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सन २०१८-१९ चा सर्वोत्कृष्ट रासेयो एकक विद्यापीठ स्तरीय पुरस्कार कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयाला आणि सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी विद्यापीठ स्तरीय पुरस्कार प्रा. प्रदीप केशव चापले यांना जाहीर करण्यात आला आहे.  
या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. डी. निमसरकार यांनी इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  . बाबासाहेब भातकुलकर यांना तसेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांना दिले आहे. महाविद्यालयात कार्यरत रासेयो एककाने कृतीकार्यक्रम ठरवून सलगपणे राबविलेल्या विविध उपक्रमांमुळेच महाविद्यालयास हे यश प्राप्त झाले असून त्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सर्व रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी यांचे योगदान मोलाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. महाविद्यालयातील विविध उपक्रमांना प्रसिध्दी देऊन महाविद्यालयाच्या यशात वाटेकरी असलेल्या सर्व वृत्तपत्रे व प्रसिध्दी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. विशेष बाब अशी की, महाविद्यालयाच्या रासेयो एककाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे मागील २०१७-१८ या वर्षीही महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट रासेयो एकक गडचिरोली जिल्हा हा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या वर्षी विद्यापीठ स्तरीय पुरस्कार मिळाला असल्यामुळे सर्व स्तरातून महाविद्यालयाचे अभिनंदन केले जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-09


Related Photos