सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतन संरचना लागू करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे विविध टप्प्यात आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यातील अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतन संरचना लागू करण्याच्या मागण्यांसह इत प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाशी संलग्नित सर्व घटक संघटनांच्या वतीने ३ जून पासून विविध टप्प्यात आंदोलने करण्यात येत आहेत.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ३ जून रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू, प्र - कुलगुरू, कुलसचिव व विभागीय सहसंचालक यांना महासंघ व सबंधित घटक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. १० जून ते १२ जून पर्यंत सर्व विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
१३ जून पासून सर्व कर्मचारी कार्यालयात काळ्या फिती लावून विद्यापीठांच्या प्रशासकीय इमारतीसमोर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी यापैकी कोणत्याही एका वेळेत निदर्शने करणार आहेत. १८ जून रोजी उच्च् शिक्षण मंडळाच्या विभागीय संहसंचालकांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. २५ जून रोजी पुणे येथील शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २९  जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महासंघाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात प्रसंगी बेमुदत संप पुकारण्यात येईल, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी  संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-08


Related Photos