राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियान राबविणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  शालेय विद्यार्थ्यांचे जीवन तंबाखूच्या विळख्यात जाऊन नष्ट होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियान राबविण्यात येणार आहे. शाळेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार शाळेत तंबाखू सेवनाची बंदी असल्याची नोटीस लावावी लागणार आहे. शाळेत नोटीसची प्रत लावण्यात येईल. शाळेत नियंत्रण समितीदेखील स्थापन करण्यात येणार आहे. तंबाखूविरोधी संदेश शैक्षणिक संस्थेच्या स्टेशनरीवर लिहिण्यात येतील. शाळांच्या वर्गावर्गात ते लावण्यात येतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाना, डेण्टिस्ट यांना बोलावून शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम, कॅन्सर ची लक्षणे, मुखतपासणी असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.  तंबाखूमुक्तीचे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर ‘तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक लावण्यात येईल.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-08


Related Photos