राजुरा येथे दूध देणारा अजब बकरा !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  राजुरा येथील  अब्दुल शेख यांच्याकडे एक अजब बकरा आढळला आहे. हा बकरा चक्क दूध असून या हे पाहिण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
  अब्दुल शेख  यांनी काही दिवसांपूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी आपल्या बोकडाला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले होते.   डॉक्टरांनी या बोकडाची तपासणी केली तेव्हा हा बकरा दूध देऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला. काही दिवसानंतर डॉक्टरांचा अंदाज खरा ठरला. या बकर्‍याने पहिल्या दिवशी दीड कप दूध दिले.  जेव्हा मालक शेख यांनी बकर्‍याचे दूध नाही काढले तेव्हा बकर्‍याला वेदना व्हायला लागल्या. त्याच्या वेदना कमी होण्यासाठी शेख यांनी दूध काढण्यास सुरूवात केली. जेव्हा या बकर्‍याचे दूध नाही काढले तेव्हा ते आपोआप ओघळू लागले. ही बाब जेव्हा शहरात पसरली तेव्हा लोकांनी या बकर्‍याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
याबाबत पशुधन विकास अधिकारी प्रमोद जल्लेवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही बाब सामान्य असल्याचे सांगितले.  अनेकवेळा एखाद्या प्राण्याच्या अवयव विकास होण्याची प्रक्रिया रखडते. त्यात दोष निर्माण होतात आणि परिणामी अशी वेगळीच बाब घडते. हीच बाब शेख यांच्या बाबतीत घडल्याचे जल्लेवर यांनी म्हटले.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-08


Related Photos