जेसीबी मशीनखाली दबून दोन जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  वर्धा :
  वर्धा-आर्वी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर पहाटे ४ च्या सुमारास जेसीबी मशीनखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या मार्गावर असलेल्या आंजी मोठी सुकळीबाईच्या दरम्यान असलेल्या मौजा आंजी मोठी येथे मुरूमाच्या सपाटीकरणाचे काम सुरू होते. पहाटेच्या अंधारात मशीनला उजेड दाखवणाऱ्या विठ्ठल रामकृष्ण भुजाडे वय ४२ रा. खरांगणा याच्यासह बाजूला उभ्या असलेल्या विलास महादेव दोंदीलकर वय ५० यांच्या अंगावरून हे मशीन गेल्याने ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या अन्य मजुरांनी या दोघांना सेवाग्राम येथे नेले असता विठ्ठल भुजाडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर विकास दोंदीलकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दरम्यान हा मशीनचालक फरार झाला आहे. खरांगणा पोलीस पुढील तपास करीत आहेत.  Print


News - Wardha | Posted : 2019-06-08


Related Photos