महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन


- नारायण खांडरे यांच्या घरी सदिच्छा भेट 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात घरोघरी महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन झाले आहे. अहेरी येथील प्रतिष्ठित नागरिक नारायण खांडरे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

देवी गौरी गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते. आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते.

अश्याच पद्धतीने मोठ्या उत्साहात प्रत्येकांच्या घरी गौरी महालक्ष्मीचे आगमन झाले असून भाग्यश्री आत्राम यांनी नारायण खांडरे यांच्या घरी भेट देऊन विविध कार्यक्रमात सहभागी झाले आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच खांडरे परिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos