बारावी पाठोपाठ दहावीतही गडचिरोली जिल्हा माघारला, केवळ ५४.६५ टक्के निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली:
नुकत्याच जाहिर झालेल्या बारावीच्या निकालात नागपूर विभागातून गडचिरोली जिल्ह्याचा सर्वात कमी निकाल लागला होता. त्यापाठोपाठ आज ८ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीच्या निकालातसुध्दा गडचिरोली जिल्हा माघारला आहे. जिल्ह्याचा निकाल केवळ ५४.६५  टक्के इतका लागला आहे.
नागपूर विभागातून भंडारा जिल्ह्याचा निकाल ६५.९९  टक्के, चंद्रपूर जिल्हा ६५.५८  टक्के, नागपूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ७१.७४ टक्के, वर्धा जिल्हा ६५.०५ टक्के आणि गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.२७  टक्के इतका लागला आहे. नागपूर विभागाचा राज्यात  सर्वाधिक कमी म्हणजेच केवळ ६७.२७ टक्के इतका निकाल आहे.
नागपूर विभागातून १ लाख ६२ हजार ५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ४१ हजार ९२० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ४० हजार २०८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ९ हजार ५६६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकूण १ लाख ८ हजार ९७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-08


Related Photos