आज दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल , इथे पाहता येणार निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शनिवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन  जाहीर होईल. हा निकाल mahresult.nic.in यासह इतर वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. 
मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मंडळाने सन २०१५मध्ये ८ जून, २०१६मध्ये ९ जून, २०१७मध्ये १३ जून, २०१८मध्ये ८ जूनला निकाल जाहीर केला होता. बीएसएनएल ग्राहकांना 'MHSSC (स्पेस) सीट नंबर' टाकून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस करून निकाल मिळवता येईल. 

या वेबसाइटवर पाहा निकाल:

maharashtraeducation.com 

mahresult.nic.in 

mahahsscboard.maharashtra.gov.in   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-08


Related Photos